महाराष्ट्र

राज्यात पुन्हा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार

पोर्शे कार अपघातानंतर पुन्हा एकदा पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची थरारक घटना समोर आली आहे. काल रात्री उशिरा एक मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरने त्याच्याकडील असलेल्या पिकअप गाडीने वाहनांना धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे.  या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.  या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात अपघातात ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे, त्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या पत्नी असल्याची माहिती आहे. गीतांजली अमराळे असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून त्या मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील करिष्मा चौक ते पौड फाटा या रस्त्यावर रात्री ११ वाजता ही घटना घडली. एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरने त्याच्याकडील असलेल्या पिकअप गाडीने ४ ते ५ वाहनांना धडक दिली. या घटनेत २ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष पवार असे चालकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. अपघातातील वाहन- टेम्पो नंबर MH 12 UM 7821 याने एक चारचाकी, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात 3 ते 4 नागरिक जखमी झाले आहेत.

Related Articles

Back to top button