क्राईम

बदलापूर पुन्हा हादरले

  • मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका 22 वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचित दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.
  • बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव परिसरात राहणाऱ्या भूमिका या तरुणीसोबत ओळख झाली होती. दोन दिवसापूर्वी भूमिका हिने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावले. 
  • रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर भूमिका हिने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकले. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर भूमिका हिच्या घरी एका मित्राने बलात्कार केला. 
  • दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी भूमिकाला संपर्क केला. त्यावेळी तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचे भूमिकाने सांगितले. 
  • त्यामुळे पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आलं. याबाबत तिने तिचे पालक आणि पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली, यात या तरुणीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. 
  • याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण भूमिका मेश्राम, साताऱ्याहून आलेला शिवम राजे ( 22 वर्ष) आणि संतोष रुपवते (40 वर्ष) या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

Related Articles

Back to top button