टेक

किआचा मोठा धमाका

  • भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढली आहे. या मागणीमुळे बाजारात आता दमदार आणि भन्नाट फीचर्ससह नवीन नवीन इलेक्ट्रिक कार्स लॉन्च होत आहे. जर तुम्ही देखील कमी बजेटमध्ये एक दमदार इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात आता एक अगदी कमी किंमतीमध्ये भन्नाट फीचर्ससह सात सीटर इलेक्ट्रिक कार लॉन्च झाली आहे.
  • किआने भारतीय बाजारात परवडणाऱ्या किंमतीमध्ये नवीन सात सीटर कार लॉन्च केली आहे. किआने बाजारात धुमाकूळ घालणारी किआ कॅरेन्स क्लॅविस आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च केली आहे. किआ कॅरेन्स क्लॅविस इलेक्ट्रिक ही भारतात विकली जाणारी सर्वात स्वस्त तीन-रो इलेक्ट्रिक कार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 17.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 24.49 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारची बुकिंग 22 जुलैपासून सुरु होणार आहे. इलेक्ट्रिक किआ कॅरेन्समध्ये काही बदल देखील ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. या कारच्या संपूर्ण फ्रंट प्रोफाइलमध्ये एलईडी डीआरएल लावण्यात आले आहे. तर नवीन 17-इंच एरो अलॉय व्हील्स आहेत, ज्यामुळे या कारला एक दमदार लूक येत आहे.
  • या कारमध्ये सिंगल मोटर सेटअप आहे जो 169 bhp पॉवर आणि 255 nm टॉर्क निर्माण करतो. ही कार 8.4 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवते. यात 51.4 किलोवॅटची बॅटरी पॅक आहे जो एका चार्जवर 490 किमीची रेंज देतो. याशिवाय, 42 किलोवॅट बॅटरी पॅक देखील उपलब्ध आहे जो 404 किमीची रेंज देतो. 

Related Articles

Back to top button