महाराष्ट्र

ब्रेकिंग! मनोज जरांगेंचा नवा बॉम्ब

  • मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज काही मराठी वृत्तवाहिन्यांबद्दल रोष व्यक्त केला. मराठी वृत्तवाहिन्यांनी सरकारचे ऐकून रिपोर्टिंग करु नये. महाराष्ट्रातील गरीब मराठे आंदोलनसाठी मुंबईत आले आहेत.
  • आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलकांकडून वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधिंसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गेल्या तीन-चार दिवसांपासून दक्षिण मुंबईत आंदोलकांकडून रस्ते आडवले जात आहेत. रस्त्यावर हुल्लडबाजी सुरु आहे, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले याबद्दल जरांगे यांनी रोष व्यक्त केला.
  • जरांगे म्हणाले की, आंदोलकांबद्दल काहीही शब्दप्रयोग केला तर आम्हालाही विचार करावा लागेल. आमचा नाईलाज होईल. राज्यातील आम्ही सात कोटी लोक तुमचे चॅनल बघतो. तुम्ही सरकारचे ऐकून आमच्याबद्दल काही खोटेनाटे आरोप पसरवत असाल तर आम्हालाही काही चॅनलबद्दल विचार करावा लागेल. असा इशारा त्यांनी दिला. तसेच ते म्हणाले की, आम्ही विचार केला तर आम्ही मराठे आणि आमचे ऐकणारे काही बांधव असे 8-9 कोटी लोकांनी ठरवले तर काही चॅनलबद्दल निर्णय घेऊ शकतो. चार-दोन दिवसांपासून आम्ही पाहात आहोत की काही चॅनल रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Related Articles

Back to top button