सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरात मोठी खळबळ, रेणू अडकली भलत्याच जाळ्यात

- सोलापुरात सायबर गुन्हेगारांचा हैदोस पुन्हा एकदा समोर आला आहे. जुळे सोलापूर येथील एका महिलेला अज्ञात आरोपींनी अगदी हुशारीने ऑनलाईन सायबर फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत तब्बल ४ लाख २४ हजार रुपयांची लूट केली आहे. हा प्रकार एचपी कंपनीच्या फ्युएल कार्डच्या अनधिकृत वापरातून झाला असून, ओटीपी लिंकद्वारे डेटा हॅकिंग व आर्थिक फसवणूक करण्यात आली. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली आहे.
- फिर्यादी रेणु व्यंकटेश बोमकंटी (वय ३७, रा. शिवरत्न नगर, जुळे सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडे असलेले एचपी कंपनीचे डीएव्ही ट्रॅक प्लस फ्युएल कार्ड (क्र. 8252371002703224) वापरून अज्ञात आरोपींनी ओटीपीद्वारे मोबाईल क्रमांक ७३६९०५८८५४ व ७३६७८९९९५८ लिंक केले. कार्ड संबंधित ग्राहक खात्यावर साठवलेली रक्कम ओटीपी हॅक करून हस्तगत करण्यात आली.
- आरोपींनी ग्राहक खाते अनुश्री टँकिंग (पत्ता – वळसंग बॅच, दक्षिण सोलापूर) या नावाने तयार करून ओटीपीद्वारे फ्युएल कार्डमध्ये अनधिकृत प्रवेश घेतला. व्हॉट्सअॅप हॅकींग, डेटा चोरी व बँकिंग फसवणूक करत फिर्यादीच्या खात्यातून ४ लाख २४ हजार रक्कम लंपास करण्यात आली.
- फसवणुकीनंतर फिर्यादीने १५ जुलै रोजी तक्रार अर्ज, तसेच १६ जुलैला अर्ज शाखा व ऑनलाईन acknowledgment (क्र. 31907250120680) सादर केली. यावरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा हे तपास करत असून संबंधित मोबाईल क्रमांक धारकांचा शोध सुरू आहे.



