महाराष्ट्र

पुणे पुन्हा हादरले!

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. दरम्यान आता पुण्यातील हडपसर भागात मध्यरात्री फायनान्स कंपनीच्या मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुलकर्णी हे पुण्यातील एक प्रतिष्ठीत फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. रविवारी रात्री कुलकर्णी हे त्यांच्या घरासमोर शतपावली करत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. परंतु पोलीसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र कुलकर्णी यांच्या खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Related Articles

Back to top button