क्राईम

बीड पुन्हा हादरले, गळा चिरला, दगडाने ठेचले

  • गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे मोठ सत्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. मशिदीजळ बॉम्ब फोडण्याची घटना ताजी असतानाच आता दुसरी एक हादरा देणारी घटना समोर आली आहे. भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भावाने आणि त्याच्या पत्नीने एकाचा दगडाने ठेचून खून केला आहे.
  • परळी तालुक्यातील सिरसाळाजवळील कान्हापूर येथील ही घटना आहे. मार्च २०२३ मध्ये अविनाश देशमुख या व्यक्तीने आत्महत्या केली होती. स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याच्या त्रासाला कंटाळून अविनाशने जीव गमावला होता. या घटनेनंतर स्वप्नीलवर गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी तो अविनाश देशमुखच्या कुटुंबियांवर दबाव आणत होता.
  • स्वप्नील काही त्रास देण्याचे थांबत नव्हता. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर अविनाशचा मोठा भाऊ धनंजय देशमुख आणि भावजय सोनाली देशमुख यांनी स्वप्नीलचा गळा चिरून आणि दगडाने ठेचून त्याचा जीव घेतला. ज्या झाडाला अविनाशने गळफास घेतला होता, त्याच झाडाखाली दोघांनी मिळून स्वप्नीलला संपवले.
  • ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच ही घटना घडल्याने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा काय वातावरण आहे, अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, या घटनेनंतर धनंजय आणि सोनाली हे स्वत: सिरसाळा पोलीस ठाण्यात हजर झाले. दोघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे.

Related Articles

Back to top button