महाराष्ट्र
ब्रेकिंग! सप्टेंबरमध्ये नोंदणी केल्यास…

- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सोलापूरसह अन्य भागात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले आहे.
- मात्र एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही. तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
- या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल. आतापर्यंत 70 ते 75 टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
- या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आली नाही. तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.