सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले

सोलापूर (प्रतिनिधी) पती-पत्नी घुंगरे गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबले असताना एका मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमाने तुमच्या दोघांच्या खात्यावर २१ हजार रुपये जमा झाले आहेत. असे सांगून फसवणूक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी मल्लप्पा महादेव बिराजदार (वय-६५, रा.मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड,सोलापूर) हे ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास एस.व्ही.एस शाळेजवळ पत्नीसोबत बसची वाट बघत थांबले असताना एका मोटर सायकलवरून आलेल्या अज्ञात इसमाने तुमच्या दोघांच्या बँक खात्यावर प्रत्येकी २१ हजार रुपये जमा झाले आहेत.
हे पैसे तुम्ही बँकेतुन काढून देण्यासाठी बायकोच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ काढून द्या.असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर २५ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम सोन्याची बोरमाळ घेऊन फसवणूक केली.याप्रकरणी मल्लप्पा बिराजदार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मोटारसायकल स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार डोके हे करीत आहेत.