महाराष्ट्र

I AM VERY HAPPY…

  • राज्यात सध्या चर्चेत असलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपले कृषीमंत्रीपद काढून घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. कृषीमंत्रिपदावरुन हटवून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार दिल्यानंतर कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. जो निर्णय घेतला आहे, तो मला मान्य आहे, असे कोकाटे म्हणाले. त्याचबरोबर दत्तात्रय भरणेंना काही मदत लागली मी नक्की करेन आणि त्यांची मला मदत लागल्यास मी घेईन, असेही कोकाटे म्हणाले.
  • नवीन खाते आवडले का?, असे विचारताच I AM VERY HAPPY, असे कोकाटे म्हणाले असून ते खरच खूश आहेत की नाराज आहेत अशा चर्चा आता रंगल्या आहेत. दरम्यान, क्रीडा आणि युवक खाते मिळाल्याने अजितदादांचे विश्वासू असलेलेल भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती. भरणेंनी खाते वाटपानंतर नाराजी उघडही केली होती. मात्र, आता कोकाटेंवरील कारवाई ही भरणेंसाठी एक लॉटरी ठरलीय, असे बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button