क्राईम

सीमाने आत्महत्या केल्याचा बनाव

ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून करून पत्नीने स्वतःच आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या शिक्षकाला खेड पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पतीला खेड न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सीमा अदिनाथ कुटे (वय 35, रा.पडाळवाडी, राजगुरुनगर, ता खेड ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी आदिनाथ सुखदेव कुटे (वय 40 रा. पडाळवाडी ता खेड, मुळ रा. अहमदनगर ) असे आरोपी शिक्षक असलेल्या पतीचे नाव आहे.
राजगुरुनगर शहरालगत पडाळवाडी (ता खेड ) येथे सदरची घटना घडली. पती सुखदेव कुटे याला दारू पिण्याचे व्यसन होते. तो सकाळीच दारू पिण्यासाठी बाहेर गेला होता. 9 वाजता घरी आल्यानंतर पत्नी सीमा हिने कुठे गेला होता, असा जाब विचारला म्हणून दोघांमध्ये भांडण झाले. दारूचा नशेत आदिनाथ याने पत्नी सीमा हिचा ओढणीने गळा दाबून खून केला. घरातील बेडचा दरवाज्याची आतील कडी चतुराईने बंद करून घेतली. मित्र व नातेवाईकांना फोन करून पत्नी सीमा दरवाजा उघडत नाही तुम्ही ताबडतोब या असा बनाव केला. स्थानिक नागरिकांनी दरवाजा तोडून सीमाचा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनी  आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिली.

Related Articles

Back to top button