राजकीय
पत्नीधर्म न पाळणाऱ्या नौटंकीबाज म्हणजे सुषमा अंधारे; शिंदे गटाने जाळच काढला

शिंदे गटाचे प्रवक्ते राजीव भोर पाटील यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचा भलत्याच शब्दात उल्लेख करत टीका केली आहे. अंधारेंनी वाचाळपणाचा कळस गाठला आहे. निव्वळ नौटंकीबाज म्हणजे अंधारे आहेत, असा उल्लेख करत भोर पाटील यांनी एक व्हिडीओ जारी करत टीका केली आहे.
अंधारेंवर टीका करताना भोर पाटील म्हणाले, अंधारेंनी वाचाळपणाचा कळस गाठला आहे. अंधारे काल मंत्री अब्दुल सत्तारांबद्दल काय बोलल्या? हे आपण सर्वांनी पाहिलं असेल. सत्तार हे घरवालीचे तरी आहेत का? असा प्रश्न अंधारेंनी सत्तारांना विचारला.
मुस्लीम धर्माचे अनुकरण कसे करावे? हे अंधारेंनी सत्तारांना शिकवण्याची गरज नाही. खरं तर, धर्माबाबत कुणालाही शिकवण्याची अंधारेंची लायकी नाही. ज्या बाईने स्वत:चा पत्नीधर्म, मातृधर्म निभावलेला नाही, असे त्यांच्या विभक्त झालेल्या पतीने जाहीरपणे माध्यमांसमोर सांगितले आहे. अशा बाईने इतरांना धर्म शिकवू नये.