देश - विदेश
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धुमाकूळ ; मात्र भारताला धोका नाही

सध्या चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. जगभरातील सुमारे 131 देशांमध्ये हे संकट वाढले आहे. दरम्यान आता भारतासाठी डोकेदुखी बातमी समोर येत आहे. कारण आता नव्याने ज्या बी एफ सेवन कोरोनाने धुमाकूळ घातला आहे , त्याचे रुग्ण भारतातील आढळून आले आहेत. यामुळे आता मोदी सरकार अलर्टवर आले आहे.
या नव्या वेहरेंटचे तीन रुग्ण भारतात आढळून आले आहेत. दरम्यान आता भारतात आता मास्क सक्ती होणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यात त्यांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, अशा सूचना केल्या आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा भारताला धोका नाही, असेही एक्स्पर्टचे म्हणणे आहे. कारण चीनची परिस्थिती वेगळी आहे. भारतातील उपायोजना सक्षम असल्याचा त्यांनी केला आहे.