महाराष्ट्र
ब्रेकिंग! मुलींच्या आश्रमात सेक्स स्कॅंडल

देशामध्ये महिलावर लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनांमुळे खळबळ उडाली आहे. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर आता बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटी या घटनेविषयी सोशल मीडियावरुन मत मांडताना दिसत पाहायला मिळत आहेत. आता ठाकरे गटाचे उपनेते आणि अभिनेते किरण माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडेतोड टीका केली आहे.
माने यांची पोस्ट- कराडजवळील टेंभू गांवातल्या ‘छत्रछाया’ या निराधार मुलींसाठीच्या आश्रमात चालणारा लैंगिक शोषणाचा भयानक प्रकार उघडकीला आला आहे ! आश्रम चालवणारी समाजसेविकाच या निराधार अल्पवयीन मुलींना अनेक बड्या धेंडांबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती… या सेक्स स्कँडलमध्ये अनेक बडे पोलीस अधिकारी असल्याचा सं
शय आहे. तसेच एका मोठ्या राजकारण्याच्या भावाचाही यात समावेश असल्याची चर्चा आहे. असो. आज लाडकी बहिण योजनेच्या चकचकीत इव्हेन्टसाठी ‘चीप’ मिनिस्टर कोल्हापुरात येणार आहेत. गृहमंत्री नेहमीप्रमाणे ‘लापता’ आहेत.