क्राईम
रिक्षाचे पैसे देण्यावरुन राडा

- राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, कुर्ला येथे एकाने किरकोळ कारणावरून आपल्या सहकाऱ्याची हत्या केली आहे. ऑटोरिक्षाचे भाडे देण्यावरुन वाद झाला आणि याच वादातून ही हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. ही घटना सोमवारी कुर्ला येथे घडली. आरोपीला पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावरून पळून जात असताना अटक केली आहे.
सैफ जाहिद अली असे आरोपीचे नाव आहे. तर छक्कन अली असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ व अली हे दोघे एकाच कापडाच्या कंपनीत काम करतात. सोमवारी दुपारी हे दोघे आर्टिरियल एलबीएस मार्गावरून जात असताना त्यांच्यात रिक्षा भाड्यावरून वाद झाला. यातून ही हत्या करण्यात आली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी हा फरार झाला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने तपास हाती घेतला. यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला कल्याण स्थानकात अटक करण्यात आली.



