महाराष्ट्र

शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला

  • जेष्ठ नेते शरद पवारांनी राजकारणातून स्वेच्छेने निवृत्ती घेण्याची आवश्यकता आहे. तसे पाहिले तर विधानसभा निवडणुकीपूर्वीच निवृत्ती घ्यायला हवी होती. आता विधानसभेत जनतेने तुम्हाला जागा दाखवली आहे. कोलांट्या उड्या मारणारा हा माणूस असून आता हा विषय संपला आहे. पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे संपला आहे, असे खळबळजनक विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
  • शरद पवार म्हणाले होते की, ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून भाजपाने लहान राज्यात पराभव स्वीकारला तर मोठी राज्ये स्वतःकडे ठेवली, अशी टीका केली होती. या टीकेवर पडळकर यांनी हे विधान केले. लोकसभेत विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्र महायुतीला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे पवार म्हणाले होते. याला उत्तर देताना पडळकर म्हणाले की, पवारांवर जनतेचा विश्वास राहिला नाही. शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला आहे.

Related Articles

Back to top button