सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! बनावट कब्जा पावती करून बेकायदेशीर अतिक्रमण

सोलापूर (प्रतिनिधी) बनावट कब्जा पावती तयार करून जागेवर शेड उभा करून बेकायदेशीर अतिक्रमण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुलै २०२२ ते नोव्हेंबर २०२४ च्या दरम्यान मजरेवाडी सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी इम्रान युनूस शेख (वय-४२,रा.सिद्धेश्वर नगर भाग २ मजरेवाडी,नई जिंदगी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गौस जब्बार पिरजादे (मु.पो.बुऱ्हानपुर ता.अक्कलकोट जि.सोलापूर) व निखत फरविन फिदाहुसेन मणियार (रा.बिजापूर,सध्या सोलापूर) यांच्यासह इतर त्यांचे तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी की,मजरेवाडी हद्दीत नवीन सर्वे नंबर ६५/१ ब,जुना सर्वे नं.२५३/१ब, यामध्ये प्लॉट नं.४७५ या प्लॉटचा गौस पिरजादे याने निखत मणियार यांचे आधार कार्ड मिळवून त्याच्या जागी दुसरी महिला उभी केली.
त्यानंतर महापालिकेच्या मिळकत कराला नोंद करून सन २०२२ चा मिळकत कर दि.८ जुलै २०२२ रोजी भरला व त्यानंतर निखत फरविन फिदाहुसेन मणियार यांनी दुसरी महिला उभी करून ७ जुलै २०२२ रोजी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर व कब्जा पावती करून घेतली.त्यासाठी साक्षीदार न वापरता अॅड.डी.एन.कोडम यांची सही व शिक्का लिहून देणार व घेणार यांना ओळखतो म्हणून घेऊन नोटरी बनावट कब्जा पावती करून त्यानंतर फिर्यादी यांच्या जागेवर शेड उभा करून बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोसई.गाढवे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button