महाराष्ट्र

ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे  राज्यातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून येत्या 17 ऑगस्टला तीन हजार रुपये मिळणार आहेत. 
यानंतर राज्य सरकारकडून दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये जमा होणार आहेत. हे पैसे किती दिवस मिळणार? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पण राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
परभणी शहरातील राजलक्ष्मी लॉन्स येथे अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी महिला मेळाव्याच आयोजन करण्यात आले होते. यावेळी तटकरे बोलत होत्या. महिलांना पुढचे सहा महिने तरी टेन्शन नाही. 
कारण त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत ही कमीत कमी सहा महिने तर शंभर टक्के मिळणार आहे, असे त्या म्हणाल्या.
कोणी कितीही काहीही अपप्रचार केला तरीही राज्यातील कोट्यावधी महिलांना दोन हप्ते मिळणार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी राज्यातील महिलांनी महायुतीच्या पाठीमागे उभे राहावे, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button