राजकीय

ब्रेकिंग! माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील ते कळणारही नाही

  1. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जेष्ठ नेते शरद पवार मनोज जरांगे यांच्या आडून राजकरण करत आहेत. माझ्या नादाला लागू नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुम्हाला एकही सभा घेऊ देणार नाही, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दिला आहे. राज हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरअसून त्यांनी मराठ्यांना आरक्षणाची गरज नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.
    माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर राज्यात सभाही घेता येणार नाहीत, माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही, असा इशारा राज ठाकरेंनी उद्धव व पवारांना देत मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवारांचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात आरक्षणाची गरजच नाही, या भूमिकेचा पुनरूच्चारही राज ठाकरेंनी केला आहे. आपल्या दौऱ्याचा जरांगे पाटलांशी काहीही संबंध नव्हता, मात्र आपल्या विरोधात जाणीवपूर्वक प्रचार करण्यात आल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

Related Articles

Back to top button