बिजनेस

खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी

  • स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसरची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या परिक्षेसाठी नोटीफिकेशनही जारी केली असून तब्बल ५४१ पदांसाठी ही भरती होणार आहे.
  • स्टेट बँकेच्या पीओ भरतीची अधिसूचनेनुसार इच्छुक उमेदवार सात जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच श्रेणीनुसार वेगवेगळे शुल्क आकारले जाणार आहे. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क ७५० रुपये आहे.
  • एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या भरती प्रक्रियेचे तीन टप्पे असतील. उमेदवारांची निवड तीन टप्प्यात केली जाईल. यामध्ये पूर्व चाचणी परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत आणि ग्रुप एक्झरसाईच परीक्षा असेल. पहिली परिक्षेनंतर मुख्य परिक्षेसाठी पात्रता ठरणार आहे अंतिम निवड मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
  • या भरतीअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ४८,४८० रुपये बेसिक पगार मिळेल. याशिवाय इतर भत्ते देखील दिले जातील. देशभरातील कोणत्याही शाखेत नोकरीची पोस्टिंग करता येते.

Related Articles

Back to top button