गुड न्यूज! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण

बजेट सादर होण्यापूर्वी आणि नंतर सोने-चांदीच्या किमतीमध्ये मोठे बदल झाले. मौल्यवान धातूच्या किंमतीत विक्रमी घसरण झाली. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढ दिसून आली. मात्र, आज खाली उतरल्या. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत दिसून आले.
या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याची किंमत 270 रुपयांनी वाढली. काल भाव 210 रुपयांनी उतरले. आज सकाळी पुन्हा किमती कमी झाल्या आहेत. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आता 22 कॅरेट सोने 63,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या आठवड्यात चांदीनेदेखील मोठा दिलासा दिला आहे. सोमवारी चांदीत पाचशे रुपयांची दरवाढ झाली. काल तितकीच घसरण झाली. आज सकाळी पुन्हा चांदीच्या किमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपये आहे.