क्राईम

जातीतील मुलीशी लव्ह मॅरेज, तरीही…

राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने जातीतील मुलीशी प्रेमविवाह केल्याचा राग आल्याने संतापलेल्या बापाने व त्याच्या भावाने पोटच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी बाप व मृत मुलाच्या भावाला अटक केली आहे. परभणीतील पिंपरी देशमुख येथे ही घटना घडली आहे.
गोविंद आवकाळे असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर माधव आवकाळे असे आरोपी बापाचे नाव आहे तर व्यंकटेश आवकाळे असे आरोपी भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदने स्वजातीतीलच एका तरुणीशी पुण्यात आळंदी येथे जावून प्रेमविवाह केला. दोन-ते अडीच महिन्यांपासून ते जोडपे पुण्यात राहत होते. दरम्यान, याचा राग गोविंदचे वडील माधव यांना होता.

गोविंद पुण्यात भाड्याने घर घेऊन राहत होता. यानंतर तो घरच्यांना त्रास देत होता. त्यामुळे वडील माधव यांनी गोविंद याला घरी बोलावून घेतले. रविवारी रात्री तो शेतात झोपला होता. यावेळी माधव व त्याचा दुसरा मुलगा व्यंकटेश याने झोपेत असलेल्या गोविंदवर धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर आणि मनगटावर वार केले. 

यात घाव वर्मी लागल्याने गोविंदचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दोघेही बाप-लेक फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी हे घरातील असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी वडील माधव व भाऊ व्यंकटेश या दोघांना अटक केली.

Related Articles

Back to top button