सोलापुरात मोठी दुर्घटना

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सोलापूर शहरात विकासकामांसाठी ठेवलेल्या प्लास्टिक पाईपांना आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली आहे. यामुळे सरकारी मालमत्तेचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बार्शी रोडवर विकासकामांसाठी ठेवलेल्या प्लास्टिक पाईपांना आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. पाईपांना भीषण आग लागण्यानंतर धूराचे लोट संपूर्ण शहरात पसरले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून सध्या त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
यापूर्वीदेखील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास कामांसाठी होम मैदान परिसरात ठेवलेल्या पाईपांना आग लागली होती. यानंतर हे पाईप बार्शी रोडवरील भोगाव परिसरात ठेवण्यात आले होते. मात्र. पुन्हा या पाईपांना आग लागल्याने अनेक शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.