सोलापूर
मोठी बातमी… पुन्हा नोटबंदीचे संकेत!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी नोटाबंदी करून खळबळ उडवून दिली होती. या निर्णयाचे पडसाद देशभरात म्हटले होते. नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदी यांनी घोषणा करून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.या निर्णयावर काहींनी टीका केली होती तर काहींनी याचे स्वागत केले होते.
मात्र आता पुन्हा नोटाबंदीचे संकेत मिळत आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करा, अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केली आहे.
गेल्या तीन वर्षापासून छापली गेली नाही परिणामी या नोटेमुळे वाढ होत आहे परिणामी दोन हजार रुपयाची नोट चलनातून बाद करावी, अशी मागणी भाजपचे खासदार सुशीलकुमार मोदी यांनी केली आहे. खासदार मोदी यांची ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मान्य करणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.



