देश - विदेश
ब्रेकिंग! दोन स्कूल बसचा भीषण अपघात, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू

हल्ली सर्वत्र अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आज मणिपूर राज्यात मोठा अपघात झाला आहे. दोन स्कूल बसचा भीषण अपघात होऊन 15 विद्यार्थ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत परिणामी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मणिपूर येथील नोनी जिल्ह्यात आज सहलीसाठी फिरायला गेलेल्या दोन स्कूल बसमध्ये टक्कर झाली. या भीषण अपघातात दोन्ही बस कोसळल्या.
ही मुले खेपुमच्या दिशेने जात होती. पिकनिकला जाताना या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला. दोन्ही बस अचानक उलटल्याने ही घटना घडली. या घटनेतील जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कसा घडला, याचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे.



