क्राईम

तलवारी फिरवत बाईकस्वारांचा स्टंट

  • बाईकवर तलवारी फिरवत बाईकस्वारांचा स्टंट एका व्हायरल व्हिडिओतून समोर आला आहे. या बाईकस्वारांना ना कायद्याचे ना पोलिसांचे भय दिसून आले. या व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी तलवारी पकडत पाच जणांवर कारवाई केली आहे.
  • प्राप्त माहितीनुसार बंगळुरूमधील नईम, अराफत, साहिल, नंजमत आणि अदनान अशी संशयित आरोपींची नावे आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये बाईकवर स्टंट करुन दहशत पसरवल्याप्रकरणी या संशयितांना अटक करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • ज्यावेळी हे बाईकस्वार स्टंट करुन तलवारी फिरवत होते, त्याचा व्हिडिओ एका जागरुक नागरिकाने काढल्याची माहिती आहे. दरम्यान, हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, बंगळुरू शहर पोलिसांनी संबंधित व्यक्तींना पकडण्यासाठी त्वरीत कारवाई केली. दरम्यान स्टंटबाजी आणि दहशत निर्माण करण्याच्या प्रकारावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Related Articles

Back to top button