क्राईम
ब्रेकिंग! राज्यात खळबळ, आजारपणाला कंटाळून बापानेच संपवले स्वतःचे लेकरू

- राज्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका क्रूर आणि अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. जन्मदात्या बापाने दारूच्या नशेत आपल्या ९ वर्षीय चिमुकलीवर कुऱ्हाडीने वार करत तिचा निर्घृण खून केला.
- विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपीने मुलीचा मृतदेह २४ तास घरात ठेवला, ज्यामुळे हा प्रकार आणखी भयावह बनला आहे. या धक्कादायक प्रकरणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
- धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील माणिकनगर शेळगाव येथे हा प्रकार घडला आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकनगर शेळगाव येथील ज्ञानेश्वर जाधव याने आपल्या मुलीवर ती वारंवार आजारी पडत असल्याच्या आणि सायकलवरून खाली पडल्याच्या रागातून, कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. हत्येच्या वेळी तो दारूच्या नशेत धुंद होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मुलीच्या आजारपणामुळे आणि किरकोळ कारणांमुळे तो चिडला होता. हत्येनंतर त्याने मुलीच्या मृतदेहावर हळदी-कुंकू टाकून तो घरातच ठेवला.
- या घटनेची माहिती मिळताच आंबी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



