क्राईम

हात उसने पैसे घेणे पडले महागात

  • हात उसने दिलेल्या पैशांवरून वाद उफाळून एका महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली आहे.
  • खून झालेल्या महिलेचे नाव श्यामली कमलेश सरकार (वय ४०, रा. रायकरमळा, धायरी) असे असून, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नितीन चंद्रकांत पंडीत (वय ५१, रा. निसर्ग हाइट्सजवळ) आहे. आरोपी रिक्षा चालक असून त्याच्याविरोधात नांदेड सिटी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामली यांची नितीन पंडीत याच्याशी काही काळापूर्वी ओळख झाली होती. श्यामली कामाच्या निमित्ताने पुण्याच्या मध्यवर्ती भागात नियमित येत होती. ती धायरी येथून प्रवास करत असताना नितीन तिची ने-आण करत असे. या ओळखीचे रूपांतर आर्थिक देवाणघेवाणीत झाले. काही काळापूर्वी श्यामलीने नितीनकडून ५० हजार रुपये हात उसने घेतले होते. पैसे परत मागितल्यावर दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.
  • अलीकडे पुन्हा एकदा त्यांच्यात पैशांवरून जोरदार वाद झाला. या वादाच्या पार्श्वभूमीवर रागाच्या भरात नितीनने श्यामलीच्या गळ्यातील ओढणीचा वापर करून तिचा गळा आवळून निर्घृण खून केला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत नितीनला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरूदत्त मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Back to top button