महाराष्ट्र
ब्रेकिंग! शरद पवारांच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात

- देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, राज्यात सभांचा धडाका सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे देखील पायाला भिंगरी लावून राज्यात फिरत आहेत. ठिकठिकाणी ते आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत आहे. आज जळगाव जिल्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळ्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यात ही घटना घडली आहे. यावल तालुक्यातील भुसावळ-यावल रस्त्यावर हा अपघात झाला.
पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चोपडा येथील सभा आटोपून ते भुसावळला जात असताना हा अपघात झाला. भुसावळकडे जात असताना त्यांच्या वाहनासमोर स्पीड ब्रेकर आल्याने वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी केला होता. मात्र पाठीमागून येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज न आल्याने ताफ्यातील शेवटी येत असलेल्या एका वाहनाने समोरिल वाहनास जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.



