राजकीय

उदयनराजे ज्याला घाबरतात तोच उतरला निवडणुकीच्या मैदानात

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, भाजपाकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले लोकसभेच्या मैदानात उतरतील. तर त्यांच्याविरोधात मविआचे शशिकांत शिंदे असणार आहेत.

यातच बिगबॉस फेम अभिजीत बिचुकलेसुद्धा अर्ज दाखल करणार आहे. शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती बिचुकले यांनी दिली. ते म्हणाले की, उदयनराजेंना संधी मिळाली. आता जनतेने यावेळी मला संधी द्यावी. उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला, याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी करावे.
बिचुकले म्हणाले की, मतदार राजा जागृत आहे. शुक्रवारी मी अर्ज भरणार आहे. भाजपाकडून उमेदवारी मिळावी, ही उदयनदादांची इच्छा होती. ती पूर्ण झाली. पण भाजपाने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनीसुद्धा करावे. दरम्यान, उदयनराजे यांनी एकदा गंमतीने प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, मी फक्त एकालाच घाबरतो, अभिजीत बिचुकलेला.

Related Articles

Back to top button