सोलापूर

डी मित्र परिवारातर्फे आयुष्मान भारत कार्ड शिबिर

सोलापुरातील बसस्थानक परिसरातील मनोहर नगर येथे डी मित्र परिवाराच्यावतीने संस्थापक अ‍ॅड. दया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

त्यानंतर नागरिकांसाठी मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शुभम शेंडगे हे होते. यावेळी सहसंस्थापक लखन पवार, संयोजक रवी पवार, लखन कांबळे, दत्ता शिंदे, राकेश देवकुळे, आदित्य चव्हाण, समाधान अष्टुळ, अक्षय कांबळे, अभय शिंदे यांच्यासह मित्र परिवारातील कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते. डी. मित्र परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

Related Articles

Back to top button