सोलापूर

प्रथमेश बॉईज हॉस्टेलमध्ये झकास सोय

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. असे असले तरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या करिअरचे वेध लागले आहे. विशेषत: नीट आणि जेईईसारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांची आता चांगलीच सोय लातूर शहरात करण्यात आली आहे.

प्रथमेश बॉइज हॉस्टेलने यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती संस्थेचे प्रमुख पी. एम. बिराजदार यांनी दिली. या हॉस्टेलची इमारत नवीन आणि सुसज्ज आहे. हा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून शांत वातावरणामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढीस लागणार आहे. हे हॉस्टेल सर्व क्लासेसपासून केवळ दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गरम पाण्याची सुविधा आहे. तसेच वायफायची सुविधादेखील उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी आरओचे पाणी उपलब्ध आहे.

सध्या या हॉस्टेलमध्ये दोन आणि तीन कॉट रूम उपलब्ध आहेत. संपूर्ण हॉस्टेल परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाईट प्रवृत्तींवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांसाठी रूचकर, स्वादिष्ट, घरगुती स्वतंत्र मेसची सुविधा उपलब्ध आहे. सोलापूर जिल्हा, अक्कलकोट तालुका, महाराष्ट्र-सीमावर्ती भाग व राज्यातील अन्य भागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रथमेश बॉईज हॉस्टेल हे ट्युशन एरिया, आरसीसी, आयआयबी, विद्या आराधना क्लासेसपासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. या हॉस्टेलमध्ये प्रवेशासाठी 8975116933, 9172154411 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Back to top button