राजकीय
ब्रेकिंग! भाजपची जाहीरनाम्यासाठी हटके आयडिया

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. नेत्यांचे दौरे, सभा, जाहिरात अशी विविध मार्गाने भाजपा लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. आता भाजपाने निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यासाठी भाजपा आता जनतेचीच मदत घेणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा जनतेसमोर मांडत असतो. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांच्या समावेश करावा? तसेच विकसित भारत कसा असावा? यासाठी भाजपने नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. १५ मार्चपर्यंत नागरिकांनी आपल्या सूचना पक्ष कार्यालयात पाठवाव्यात, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे.
चांगल्या सूचनांचा संकल्पपत्रात समावेश करावा, या हेतूने हे अभियान सुरु करण्यात आले आहे. नमो ॲप, ट्वीटरसारख्या अशा विविध मार्गांनी नागरिक भाजपला सूचना करू शकतात. तसेच 9090902024 या क्रमांकावरूनही नागरिकांना जाहीरनामा कसा हवा, याच्या सूचना देता येणार आहेत.