महाराष्ट्र

ब्रेकिंग! जरांगे सोलापूर दौऱ्यावर

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे. त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. दरम्यान त्यापूर्वी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
आज मला दवाखान्यातून सुट्टी मिळणार आहे. त्यानंतर मी अंतरवालीमध्ये जाईल. काही लग्नसमारंभ आहेत आणि समाजाच्या बैठका देखील आहेत. त्याला उपस्थित राहणार आहे. माझा चार तारखेला सोलापूर दौरा आहे. पाच तारखेला मी बीडला जाणार आहे. मराठा समाजाला विनंती करतो की, सगळ्यांनी साखळी उपोषण करायचे आहे. जे आरक्षण टिकणार नाही, ते आरक्षण घ्या म्हणत आहेत. ते दहा टक्के टिकणार नाही, पण जर ते दहा टक्के आरक्षण त्यांनी ओबीसीमधून द्यावे आम्ही स्विकारू, मी दहा टक्के आरक्षण घेतले नाही तर मी वाईट आणि स्विकारले तर ते माझे मुके घेतील, असा टोला जरांगे यांनी लगावला.

Related Articles

Back to top button