क्राईम

सोलापुरातील लग्नात भलताच कांड

सोलापूर (प्रतिनिधी) लग्नात विनापरवाना साऊंड सिस्टिम लावल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २४ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास बापूजी नगर येथे घडली.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर किसन गुंड नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून दीपक भास्कर म्हेत्रे,पैगंबर राजू शेख,शाहाबाज हनीफ रंगरेज (रा.शुक्रवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,बापूजी नगर येथील मोर्चे समाज ऑफिस जवळ दीपक म्हेत्रे याने त्याच्या भावाच्या लग्न समारंभाच्या निमित्ताने घरासमोर विनापरवाना साऊंड सिस्टिम ऑपरेटर पैगंबर शेख याने मोठमोठ्याने चालू ठेवून त्या साऊंड सिस्टिम समोर लोकांना नाचवून उपद्रव करीत असताना मिळून आले आहे.व तसेच शाहाबाज रंगरेज याने त्यांच्याशी संगणमत करून विनापरवाना साउंड सिस्टिम लावली आहे.असे फिर्यादीत नमूद आहे.पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button