लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी

विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने लाडकी बहीण योजनेत बदल करण्याची घोषणा केली आहे. आता या योजनेअंतर्गत महिलांना अधिक रक्कम दिली जाणार आहे.
या नवीन बदलामुळे महिलांना आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यास अधिक मदत होईल. आता लाडक्या बहिणींना 2100 रूपये मिळणार आहेत. पण हे पैसे कधी मिळणार याची माहिती समोर आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्यातील 2. 34 कोटी सदस्य महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. जे नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील आणि डिसेंबर महिन्यांपासून लाडक्या बहिणींना योजनेतील पुढील हप्त्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होणे अपेक्षित आहे.
लाभार्थी महिलांना या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळेल, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. सरकारकडून याबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.