क्राईम
धनंजय मुंडेंची गँग औरंगजेबापेक्षा क्रूर

- माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासाखेच आहेत, असे माझगाव सत्र न्यायालयाने म्हटले आहे. धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले होते. मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. त्यानंतर आता करुणा यांनी समोर येत न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. मी ठेवलेली बाई नाही. मला दोन मुले आहेत. 25-50 कोटी रुपये घेऊन मी शांत बसेल, असे मुंडे यांना वाटले होते, असेही त्या म्हणाल्या. तसेच धनंजय मुंडे यांची गँग औरंगजेबापेक्षा क्रूर आहे, असा दावा त्यांनी केला.
- काय काय त्याग केलेला आहे, हे कोर्टात अजूनही देणे बाकी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण हे फारच क्रूर आहे. क्रूर वृत्तीने ही हत्या झालेली आहे. न भूतो ना भविष्यती ही घटना आहे. औरंगजेबावर एक चित्रपट आला आहे. मात्र औरंगजेबापेक्षा क्रूर वृत्ती ही धनंजय मुंडे आणि त्यांच्या गुंडा गँगची आहे. ही गँग खूप मोठी आहे. त्यांची सर्व कामे ही गँगमार्फतच चालतात. सुंब जळाले पण पीळ गेला नाही, अशी त्यांची प्रवृत्ती आहे, असा गंभीर आरोपही करुणा यांनी केला.
- माझ्या आईने आत्महत्या केलेली आहे. मी 2008 साली विष प्राशन केले होते. त्यानंतर मी पाच दिवस सीएचएल अपोलो रुग्णालयात भरती होते. माझ्या बहिणीसोबतही बलात्कार झालेला आहे. आज माझ्यावर ज्या पद्धतीने दबाव टाकला जात आहे, त्याच पद्धतीने माझ्या आईवरही दबाव टाकण्यात आला होते. याच दबावामुळे माझ्या आईने आत्महत्या केली होता, असाही आरोप करुणा मुंडे यांनी केला.



