खेळ

टी-२० वर्ल्डकप ! पाकिस्तानच्या विजयानंतर भारतासाठी मोठी गुड न्यूज

टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत अंतिम सामना खेळणारा पहिला संघ ठरला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला, जो पाकिस्तानने 7 विकेट्स राखून नावावर केला. 

पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत कशीबशी जागा मिळवली आणि आता उपांत्य सामना जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दुसरीकडे न्यूझीलंडची मात्र पुन्हा एकदा निराशा झाली. पाकिस्तानच्या विजयात त्यांचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांचे योगदान महत्वाचे राहिले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने 20 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 152 धावां उभ्या केल्या.
पाकिस्तानला विजयासाठी 153 धावांची आवश्यकता होती, जी त्यांनी 5 चेंडू राखून पूर्ण केली. पाकिस्तानने अवघ्या 3 विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. पाकिस्तानच्या विजयात वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याचेही योगदान महत्वाचे राहिले. त्याने फिन एलन आणि केन विलियम्सन यांच्या विकेट्स घेतल्या.
आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारताचा विक्रम चांगला नाही. टीम इंडियाचा प्रत्येक वेळी पराभव झाला आहे, न्यूझीलंडने २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये सेमीफायनल आणि २०२१ च्या टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा पराभव केला आहे. त्याचबरोबर विश्वचषकात पाकिस्तानला भारताकडून अनेकदा पराभव पत्करावा लागला आहे. 
२०२१ टी-२० विश्वचषक वगळता इतर सर्व विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या चाहत्यांना असे वाटते की, जर फायनलमध्ये न्यूझीलंड किंवा पाकिस्तानशी सामना झाला तर तो असा संघ असावा की भारतीय संघाला लढताना फारशी अडचण येणार नाही. त्यामुळे भारतीय संघासाठी आता ही एक गुड न्यूज आली आहे. आता भारत फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करेल, अशी आशा आहे. त्तपूर्वी भारत-इंग्लंड सेमी फायनलचा सामना गुरुवारी होणार आहे.

Related Articles

Back to top button