मोठी बातमी! आता समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली

देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे. सर्व राज्यांनी यावर विचार करावा. जी राज्ये हा कायदा लागू करतील, ते अभिनंदनास पात्र असतील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राजनाथ म्हणाले की, 2024 साठी वातावरण बनले आहे. केवळ गुजरातच नाही तर देशातही पुन्हा मोदी सरकार सत्तेत येईल. गुजरातमध्ये आम्ही जिंकणारच आहोत. पंतप्रधान देशभरात फिरत आहेत. किती कष्ट घेत आहेत. त्याचा परिणाम देशाची कामगिरी सतत चांगली होण्यात होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांची तुलना रावणाशी केल्यावरून सिंग म्हणाले, त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. मर्यादा पाळली पाहिजे. ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांना हे शोभत नाही. पंतप्रधान हे कुणा एकाचे नसतात. काँग्रेस पक्ष हताश, निराश झाला आहे.