क्राईम
वाल्मिक कराडने बीडवरून पुण्याला कसा पळ काढला?

- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचा वाल्मिक कराडवर आरोप होत . कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात 31 डिसेंबर रोजी आत्मसमर्पण केले होते. पण, आत्मसमर्पण करण्यापूर्वी कराड आणि त्याचे साथीदार कुठे पळाले होते, याचे सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे.
- खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी कराड आणि इतर आरोपींनी सीआयडीला शरण येण्यापूर्वी पुण्याला पळ काढला होता. ते बीडवरून पुण्याला गेल्याची माहिती आहे. याविषयीचे पुष्टी देणाऱ्या तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्यांमधून हत्या प्रकरणातील आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे.
- हत्या प्रकरणातील आरोपींनी बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले. तसेच एका पेट्रोल पंपावर त्यांनी आपल्या गाडीत डिझेल भरले. याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1.36 वाजता पास झाल्या. या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेला अशी चर्चा आहे.