क्राईम
अभिनेत्याचा भयानक कांड

- मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हाय झुमका वाली पोर या गाण्यात झळकलेला अभिनेता विनोद कुमावत याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान विनोदने पीडितेशी ओळख वाढवून, तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. लग्नाचे वचन देऊन त्याने आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार या महिलेने केली आहे. पीडितेने आपली तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.
विनोदने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून, आपले शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप या पीडित महिलेने केला आहे. सदर तक्रार नोंदवताना पीडितेने म्हटले की, मागील पाच महिन्याच्या काळात विनोदने आपल्याला विविध ठिकाणी नेत अत्याचार केला आणि आपल्याला मारहाण देखील केलीआहे. आता नाशिकरोड पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे. तर, विनोद विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
अभिनेता विनोदने लग्नाचे आमिष दाखवून ३० ऑगस्ट २०२२ ते १७ जानेवारी २०२३ या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच पीडित महिलेने त्याच्याकडे त्याच्या पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता, तिला शिवीगाळ करून मारहाण केली.