राजकीय

ब्रेकिंग! इंडिया आघाडी संपली आहे

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीला पहिल्यांदा हजेरी लावली. दरम्यान महाविकास आघाडीच्या या बैठकीतून बाहेर आल्यानंतर लोकसभेच्या जागावाटपावर बैठक सकारात्मक झाल्याचे म्हटले. तसेच यावेळी इंडिया आघाडी शिल्लक राहिली नाही, असे वक्तव्यही आंबेडकर यांनी केले आहे.
बैठक अजून सुरु आहे. मला बाहेर जायचे असल्यामुळे मी बैठकीतून बाहेर निघालो आहे. जे मुद्दे मी बैठकीत ठेवले होते, त्या मुद्द्यांच्या संदर्भात तिन्ही पक्ष अंतर्गत चर्चा करत आहेत. या मुद्द्यांमध्ये आणखी काही मुद्दे सामील करायचे असल्यास ते केले जातील. त्यानंतर एक ड्राफ्ट तयार होईल. इतर मुद्द्यांवरील चर्चा ही सुरू राहील. मला काही बाहेर कामानिमित्त जायचे आहे त्यामुळे मी निघालो आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.
महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये, याची दक्षता घेण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे जागावाटप हे दुसऱ्या टप्प्यात ठरवले जाईल. त्याआधी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा होणार आहे. इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही. आमचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा भाग होण्याचा विषय नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button