क्राईम

ब्रेकिंग! सोलापूरकर पुन्हा हादरले

सोलापूर : शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो, म्हणून बापानेच स्वतः च्याच मुलाला कोल्ड ड्रिंक्समध्ये विष घालून जीवे मारल्याची दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे.
१३ जानेवारी रोजी रात्री 10 वाजताचे सुमारास, सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ एक लहान मुलाचे मृतदेह मिळून आले होते.
संबंधित माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तत्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले होते. दरम्यान पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू वय- १४ वर्षे, राहणार भवानी पेठ, सोलापूर अशी पटली.
आपल्या राहत्या घरातून तो सायंकाळी घराबाहेर पडला होता. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि घरापासून ते घटनस्थळ पर्यंतचे cctv फुटेज तपासले होते. पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादीचे पती म्हणजेच मयत मुलाचे वडील यांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
यात मयत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीने दिलेली माहिती अशी की, मुलगा विशाल हा शाळेत व शेजारील लोकांसोबत सतत खोड्या करायचा व त्याचे शाळेतील सततच्या तक्रारी, अभ्यास न करणे, घरात व शाळेत खोड्या करणे, सतत मोबाईल पाहणे याचा राग मनात धरुन वरील वेळी व ठिकाणी निर्मनुष्य ठिकाणी मोटार सायकलवर घेवून जावुन त्यास थम्सअपमध्ये सोडीयम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून मुलगा विशाल यास पाजुन जीवे ठार मारल्याची कबुली बापाने दिली आहे.

Related Articles

Back to top button