महाराष्ट्र

अहो आश्चर्यम, एटीएममधून पैशांऐवजी निघाला चक्क साप

अलीकडे एटीएमचे वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. सरासपणे पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर केला जातो. शहरी व ग्रामीण भागात सुद्धा हा प्रकार वाढला आहे. राज्यातील एका शहरात आश्चर्यजनक घटना घडली आहे. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएमला गेलात आणि पैशा ऐवजी सापच तुमच्यासमोर आला तर तुमची काय परिस्थिती होईल याची कल्पना न केलेली बरी.

  • असाच काहीसा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे. या जिल्ह्यातील माटोळा येथील काही युवक पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये गेले आणि त्यांच्या सोबत हा भयंकर प्रकार घडला. काही तरुण मंडळी स्टेट बँक एटीएम सेंटरमध्ये गेले होते.
दरम्यान त्यांना एटीएम जवळ नागराज विराजमान असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून ते तरुण अचंबित झाले आणि क्षणभर त्यांना भीती वाटली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ सर्पमित्राला बोलावून घेतले. त्या सर्व मित्रांनी संबंधित सापाला सोडून दिले. सध्या घटनेचा व्हिडिओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला असून तो मोठ्या प्रमाणात गाजत आहे. 

Related Articles

Back to top button