क्राईम

ब्रेकिंग! गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात नवी अपडेट

अलीकडे राज्यात एक खळबळजनक घटना घडली होती. पुण्यातील गुंड शरद मोहोळ यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता. उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गुंड मोहोळ हत्या प्रकणात पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यामुळे मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल आरोपींना पुरवले असल्याची माहिती आहे. धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
शरद मोहोळचा पाच जानेवारी रोजी भरदिवसा सुतारदरा येथील घरासमोर खून करण्यात आला होता. त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व त्याच्या इतर साथीदारांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती.

Related Articles

Back to top button