क्राईम

ब्रेकिंग! ट्रक, कार आणि एसटीच्या धडकेत नऊ जणांचा जागीच मृत्यू

  • राज्यात एक भीषण अपघात झाला आहे. पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ हा अपघात झाला आहे. यात आयशर आणि एसटीच्यामध्ये आल्यानंतर छोटा आयशर टेम्पोचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी धाव घेत, जखमींना तात्काळ खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली. या बाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार पुणे – नाशिक महामार्गावर जात असताना एसटीच्या मागे हा छोटा टेंम्पो जात होता. तर त्याच्या पाठीमागून आयशर गाडी प्रवास करत होती. मात्र आयशरने जोरात धडक दिल्याने छोटा टेम्पो हा बसवर जाऊन आदळला. दोन्ही गाड्यांच्यामध्ये आल्याने छोटा टेम्पोमधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत.
  • नारायणगाव जवळ हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली. पुढे एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स ऑटो आपटली. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर तिघे जखमी असल्याचे सांगितले जात आहेत.

Related Articles

Back to top button