सिक्किममध्ये जेमा येथे भीषण अपघातात भारतीय लष्कराचे १६ जवान शहीद झाले आहे. धोकादायक वळणावरून जाताना लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. सकाळी लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन जात होत्या. हा ताफा चटणहून थंगूच्या दिशेने निघाला होता.
जेमा येथे जात असताना वळणावर तीव्र उतार असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन खाली दरीत जाऊन कोसळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरु आहे. 4 जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलेल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन कनिष्ठ अधिकारी आणि 13 जवानांना मृत्यू झाला आहे.