सोलापूर
मुळेगावात राजकीय नेत्यांना बंदी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगावातील सकल मराठा समाज व इतर जाती धर्माच्या समाजातर्फे चावडीपासून ते पूर्ण गावभर कॅन्डल मार्च काढण्यात आला.
यावेळी जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं, अशाप्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. मुळेगावात ग्रामस्थांकडुन राजकीय, सामाजिक, तसेच सर्व पक्षिय आमदार – खासदार, नेतेमंडळी यांना गावात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे.