मनोरंजन

‘धडाकेबाज’ नेत्याचा ‘भरधाव’ प्रवास पडद्यावर

देशाच्या राजकारणातील मोठे नाव असलेले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे. मोशन पोस्टर प्रदर्शित करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
नितीन गडकरी, म्हणजे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. देशातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या गडकरी यांची ओळख हायवे मॅन ॲाफ इंडिया अशीही झाली आहे. 

दरम्यान देशाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असणाऱ्या गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित गडकरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे.
हायवे मॅन ॲाफ इंडिया या चित्रपटाचे टीझर नुकतेच पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते अक्षय अनंत देशमुख आहेत. यामध्ये गडकरींची भूमिका कोण साकारेल? यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून याचा खुलासा लवकरच होणार आहे.

Related Articles

Back to top button