खेळ

ब्रेकिंग! भारताला तगडा झटका

वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्या आधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलची प्रकृती अचानक बिघडली आहे. शुभमन रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात खेळण्याची शक्यताही कमी आहे. मात्र, पाकिस्तानसोबतच्या सामन्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो. शुभमन खेळू शकला नाही तर इशान किशन आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करू शकतात.

सध्या शुभमन विलक्षण फॉर्ममध्ये आहे. शुभमन आणि रोहितच्या ओपनिंग जोडीमुळे टीम इंडियाला एक चांगली सुरुवात मिळत असल्याचे गेल्या काही सामन्यातून दिसून आले आहे. परिणामी शुभमन रविवारी संघात नसेल तर त्याची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल.
शुभमनची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परिणामी रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहेत. काही चाचण्यांनंतर संघ व्यवस्थापन आज शुभमनच्या खेळण्याबाबत निर्णय घेतील.

Related Articles

Back to top button